Shopping cart

  • Home
  • News
  • कन्हान शहरातील तारसा पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

कन्हान शहरातील तारसा पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

June 17, 20251 Mins Read
658

India Morning News

Share News:
Share

नागपुर ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली.

कन्हान : – कन्हान शहरातील गहुहिवरा चौक येथील तारसा पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याबाबत आणि वाहतुक वळवण्याबाबत नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांनी रविवार (दि.१५) जुन रोजी अधिसुचना जारी केली .

मागील काही महिन्या पासुन तारसा पुलावरुन मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकांची वाहतूक सुरू आहे . टोल वाचवण्यासाठी बिनधास्त पणे कोळसा , गिट्टी , माती , राख आणि इतर जड वाहतुक शहरात प्रवेश करुन तारसा मार्गाने होत पुलावरुन जात आहे . या मार्गावर शाळा , महाविद्यालये , बाजारपेठा आहेत . दररोज हजारो नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे . कोणत्या क्षणी अपघात होईल याची दाट शक्यता नाकारता येत नाही .

अधिसुचना लागु , जड वाहनांचा मार्गात बदल

कन्हान पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत तारसा रोडवरील गहुहिवरा चौकात महारेल कडून वर्ष २०२३ मध्ये रेल्वे रुळावर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते . पुलावरुन ३५ ते ४० टन पर्यंत जड वाहतुक होऊ शकते असे सांगण्यात आले होते . सदर जड वाहनाकरिता पर्यायी रोड असतांना देखील टोल चुकविण्याच्या उद्देशाने ५० ते ६० टन पर्यंतची जड वाहनांची पुलावरुन वाहतुक होत आहे . त्यामुळे पुलावर दोन बाजु मध्ये मधोमध ५ ते ६ इंच पर्यंत अंतर पडले आहे . यापुढे अशाच प्रकारे जड वाहतुक होत राहली तर पुलाचे नुकसान होऊन पुलाचे दोन्ही बाजुला असलेल्या लोकांच्या घरांवर पुल कोसळून जिवितहानी व मालमत्ताहानी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . त्यामुळे तारसा रोडवरील गहुहिवरा रेल्वे पुलावरील वाहतुक अधिसुचना प्निर्गमीत करण्यात आली आहे .
नागरिका मध्ये पोहचणारा धोका , अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरिता नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ , ११६ , ११७ (१९८८ चा नियम ५९) या नुसार आदेश पारीत केले आहे . कोळसा खदान गोंडेगाव , कामठी ओ.सी.एम. ते कांद्री ते तारसा चौक ते तारसा रोड कन्हान ते गहुहिवरा रेल्वे पुल कन्हान ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ बायपास रोड नागपूरकडे जाणारी वाहतुक ही कोळसा खदान गोंडेगाव, कामठी ओ.सी.एम. ते जबलपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ टेकाडी बायपास रोड ते बोरडा टोल नाका ते नागपूरकडे जाईल. कामठी ते तारसा चौक कन्हान ते गहुहिवरा रेल्वे पुल तारसा रोड ते बायपास रोडकडे जाणारी वाहतुक ही कामठी ते कांद्री ते टेकाडी ते नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ बायपास रोडकडे जाईल . तारसा रोड ते गहुहिवरा रेल्वे पुल तारसा रोड कन्हान ते कामठीकडे जाणारी वाहतुक ही तारसा रोड ते जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ बायपास रोडकडे जाईल.

अधिसुचना (दि.१६) जुन २०२५ रोजी पासुन ते (दि.१५) नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहील .

केंद्रीय मंत्री आणि पाककमंत्र्यांनी निवेदनाची घेतली दखल

कन्हान शहरातील गहुहिवरा चौक येथील तारसा पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा मागणी साठी सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवार (दि.१५) जुन रोजी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती . मंत्र्यानी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई चे आदेश दिल्याने या संदर्भात अधिकार्यांनी तात्काळ कारवाई करुन अधिसुचना लागु केली आहे . तारसा पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना , विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share