Shopping cart

  • Home
  • News
  • आंबेडकरी चळवळीतील वारसदार सर्वोच्च शिखरावर; भूषण गवई सरन्यायाधीश म्हणून ‘या’ दिवशी घेणार शपथ!

आंबेडकरी चळवळीतील वारसदार सर्वोच्च शिखरावर; भूषण गवई सरन्यायाधीश म्हणून ‘या’ दिवशी घेणार शपथ!

April 13, 20251 Mins Read
100

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली (प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई लवकरच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई सरन्यायाधीशपदाची सूत्रे १४ मे २०२५ रोजी स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदाची शपथ दिली जाईल.

न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश म्हणून सुमारे सहा महिन्यांचा कार्यकाळ लाभणार असून, ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

मुलुखगिरीतून सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास –
भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांनी मुंबईतून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून १९८५ मध्ये वकिलीचा प्रारंभ केला. मुंबई आणि अमरावती येथे काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायव्यवस्थेतील वाटचाल सुरू झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि पुढे २४ मे २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

नवीन कार्यपद्धती राबवणारे न्यायमूर्ती-
न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकांसाठी आठवड्यातून एक दिवस राखून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ही पद्धत सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायप्रवेशासाठी उपयुक्त ठरली.

याशिवाय, त्यांनी उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईवर सरकारला जाहीर फटकारले, तसेच न्यायालयात वकिलांनी उचक्या घेऊन बोलणे, किंवा आवाज चढवून वाद घालणे यासंबंधी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी शिस्तबद्ध न्यायालयीन वातावरणावर भर दिला.

कौटुंबिक पार्श्वभूमी –
भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत. रा.सु. गवई यांनी खासदार, आमदार आणि राज्यपाल अशा अनेक पदांवर कार्य केले होते. कमलाताई गवई यांच्या देखील सामाजिक योगदानाची परंपरा भूषण गवई यांनी पुढे चालवली आहे

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share