India Morning News
निकाल आता 21 डिसेंबरला जाहीर होणार
नागपूर – महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या प्रक्रियेत मोठा बदल घडवणारा निर्णय आज नागपूर खंडपीठाने दिला आहे. उद्या होणारी मतमोजणी तत्काळ स्थगित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्याने संपूर्ण राज्यातील निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे.
मतमोजणी पुढे ढकलण्यामागील कारण म्हणजे निवडणुकांसंदर्भात दाखल झालेल्या काही महत्वाच्या याचिकांची अदालताने केलेली सुनावणी. न्यायालयाने प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत मतमोजणी थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता पूर्णपणे बाद झाली असून, आता अंतिम निकाल 21 डिसेंबरला घोषित केले जातील.
या घडामोडीनंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनांना नव्या तारखेनुसार तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मतमोजणी स्थगित झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय समीकरणे आणखी एकदा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील मतदारांचे लक्ष आता सरळ 21 डिसेंबरकडे लागले आहे. स्थानिक सत्तेची किल्ली कोणाच्या हातात जाणार? कोणत्या पक्षाला जनता कौल देणार? याचे उत्तर मिळण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.




