India Morning News
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. 26 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमुळे देशभर दुःख आणि संतापाची लाट आहे. या घटनेनंतर अनेक देशांच्या नेत्यांनी दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याचे आश्वासन दिले, तर भारताने पाकिस्तानला कोंडणीत पकडून त्याच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत म्हणाले, जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवता आणि आजकाल त्यालाच हिंदू धर्म असं मानलं जातं. या विधानाने सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. ते पुढे म्हणाले, आपले सैनिक किंवा इथले लोक कधीच धर्म विचारून कोणाला मारत नाहीत. पण जे लोक काल हल्ला घडवून आणत होते, ते आपल्या धर्माचा चुकीचा अर्थ लावत होते. हिंदू कधीही असं करणार नाहीत. म्हणूनच आपला देश बलवान असावा लागेल.”
धर्म आणि अधर्माच्या संघर्षाचे वर्णन
“ही धर्म आणि अधर्माच्या लढाईची वेळ आहे,” असे मोहन भागवत स्पष्टपणे म्हणाले. “आपल्या मनात दुःख आहे, पण क्रोधही असावा लागतो. कारण असुरांचे नाश करण्यासाठी अष्टादशभुजा देवीच्या शक्तीची आवश्यकता असते.भागवत यांनी रावणाचा दाखला देत सांगितले की, “काही लोक सुधारत नाहीत, त्यांचे शरीर, मन आणि बुद्धी बदलणे शक्य नाही. रावण सुधारणार नाही, म्हणून रामाने त्याचा वध केला.
समाजाची एकजुटी आणि शक्तीवर भर
भागवत यांनी समाजाच्या एकतेला महत्त्व दिले आणि इशाराही दिला, जेव्हा आपला समाज एकजूट होईल, तेव्हा कोणीही आपल्याला वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. जर कोणी असे केले, तर त्याचे डोळे फुटतील.शक्ती आणि अहिंसा विषयी बोलताना ते म्हणाले, द्वेष आणि शत्रुत्व आपल्यात नाही, पण मार खाणं देखील आपल्यात नाही. शक्तिशाली माणूस अहिंसक असावा लागतो, पण जर त्याच्यात शक्ती असेल, तर ती योग्य वेळी दाखवली पाहिजे.
देशाच्या सामर्थ्यावर विश्वास
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात भारताच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. आपला देश शक्तिशाली असावा लागेल, कारण आपली सुरक्षा आणि देशाची प्रतिष्ठा यासाठी हा सामर्थ्य आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.






Comments are closed