Shopping cart

  • Home
  • News
  • मी दररोज गोमूत्र घेतो, ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त; नितेश राणेंचे विधान चर्चेत

मी दररोज गोमूत्र घेतो, ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त; नितेश राणेंचे विधान चर्चेत

April 22, 20251 Mins Read
54

India Morning News

Share News:
Share

मुंबई: राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत वादग्रस्त विधान करून नव्या चर्चांना सुरुवात केली आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आलं की, “तुम्हाला रुह अफजा आवडतं की गुलाबाचं सरबत?” यावर त्यांनी दिलेलं उत्तर अनेकांना आश्चर्यचकित करणारं होतं.

नितेश राणे म्हणाले, “मी दररोज गोमूत्र सेवन करतो. ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मला ना कोणी रुह अफजा आणून देणार, ना गुलाबाचं सरबत. आणि खरं सांगायचं तर, मला ते फार गोडसर लागतात.”

राजकीय भूमिकेवरही स्पष्ट भाष्य –

आपल्या राजकीय भूमिकेबाबत खुलासा करताना नितेश राणे म्हणाले, “आमचं बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ३९ वर्षांचं नातं होतं. जर उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला नसता, तर आम्ही आजही अभिमानाने शिवसैनिक म्हणून उभे राहिलो असतो.”

“काँग्रेसमध्ये काही काळ होतो, पण आमचं रक्त नेहमीच भगवंच राहिलं. आता भाजपमध्ये असून आम्हाला खूप अभिमान वाटतो,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे हिंदुत्व आणि राजकारण या विषयावर पुन्हा चर्चा रंगली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share