55
India Morning News
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मैत्रीच्या हालचालींनी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, ठाकरे बंधू एकत्र येत असतील, तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बाब ठरेल.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवाद आणि युतीच्या चर्चांवर बोलताना फडणवीस म्हणाले, एकाने पुढाकार घेतला आणि दुसऱ्याने प्रतिसाद दिला, मात्र काही अटींचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे यावर सविस्तर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. दोघांनी ठरवायचं आहे, आपण फक्त वाट पाहूया.
तसेच येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीच विजयश्री खेचून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.










Comments are closed