Shopping cart

  • Home
  • News
  • शाळांमध्ये परिणामकारक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवा

शाळांमध्ये परिणामकारक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवा

May 6, 20250 Mins Read
71

India Morning News

Share News:
Share

अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांचे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना आवाहन

नागपूर, ता. ६: महापालिकांच्या शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांतर्फे परिणामकारक व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी केले. नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे (एनजीओ) उपक्रम राबविले जातात. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या अध्यक्षतेखाली एनजीओंच्या प्रतिनिधींची बैठक आज महापालिकेच्या मुख्यालयात पार पडली.

यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, आकांक्षा शाळेचे नोडल अधिकारी श्री. विनय बगले तसेच एनजीओ चे प्रतिनिधी उपस्थित होते. यात पियूष वानखेडे व जीवन मेहेर (एचसीएल फाऊंडेशन), श्रीमती शर्मिष्ठा गांधी (आरोह), रामकुमार सोनुले, श्रीमती प्रिया बेलसरे (होंडा की पाठशाला), श्रीमती स्नेहल कोट्टे (उदय एनजीओ), श्री. प्रणय देशभ्रतार, श्रीमती श्रद्धा चिखलकर (मेलजिओ), श्री. मोहन पांडे (मासूम), श्रीमती पौर्णिमा ढवळे (प्रथम एज्युकेशन), श्रीमती शबाना अंसारी, श्री. आशीष शर्मा (आकांक्षा फाऊंडेशन), नितेश नागदेवे (सह्याद्री फाऊंडेशन) प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्थांतर्फे महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती एनजीओंच्या प्रतिनिधींकडून अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी समजून घेतली. पर्यावरण, संगणक साक्षरता, झोपडपट्टीतील मुलांचा विकास, आरोग्य, रस्त्यावर फिरणारे मुले, १० वीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणे, बालवाडीमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती एनजीओच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली. एनजीओंनी त्यांच्या शाळांमधील शिक्षणवृद्धीसाठी चालविल्या जात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच आकांक्षा फाऊंडेशनने माझी शाळा, सक्षम शाळा या शाळा रुपांतरण प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले. शाळा रुपांतरणासंदर्भात सर्वसमावेशक अभ्यास व प्रकल्पाची प्रक्रिया मूल्यमापन आयडी इनसाईट या संस्थेच्या प्रतिनिधींनी सादर केले.

यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा परिणाम दिसून आला पाहिजे, यावर भर दिला. एनजीओतर्फे चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे परिणाम दृश्यमान असले पाहिजे. या उपक्रमांना यापुढे बळकट व परिणामकारक कसे करता येईल, यावर विचार होण्याची आवश्यकता आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी एनजीओंना येत असलेल्या अडचणी समजून घेण्याची तसेच या अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे मदत देण्याचे आश्वासनही श्रीमती वैष्णवी बी. यांनी यावेळी दिले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share