Shopping cart

  • Home
  • News
  • भारत माघार घेणार नाही,दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होणार;पंतप्रधान मोदींचा इशारा

भारत माघार घेणार नाही,दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होणार;पंतप्रधान मोदींचा इशारा

April 24, 20251 Mins Read
54

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारताचे २६ नागरिक हौतात्म्याच्या मार्गाला गेले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली असून पाकिस्तानविरोधात ठोस कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला आहे.

बिहारमध्ये ‘राष्ट्रीय पंचायतराज दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी शहिदांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून केली. भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक शब्दांत भूमिका मांडली.

“भारत या दहशतवादी कृत्यांना माफ करणार नाही. ज्यांनी हे कुकृत्य केलं आहे, त्यांना आणि त्यामागे असलेल्या सगळ्यांना ओळखून कडक शिक्षा केली जाईल,” असं पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “हे आता अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. भारत आता शांत बसणार नाही. १४० कोटी नागरिकांचा निर्धार दहशतवाद्यांचं अस्तित्व उध्वस्त करणार आहे. त्यांच्या कल्पनेपलीकडची शिक्षा त्यांची वाट पाहते.”

महत्त्वाचं म्हणजे, हिंदीतून भाषण करत असतानाच पंतप्रधान मोदी अचानक इंग्रजीत बोलायला लागले. भारताची ही ठाम भूमिका आणि आक्रमक पवित्रा दहशतवाद्यांसाठी स्पष्ट संदेश आहे. आता माफी नाही, फक्त शिक्षा, असे मोदी म्हणाले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share