India Morning News
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जोरदार बदला घेत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर प्रचंड हल्ला चढवत नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या धडक कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने ७-८ आणि ८-९ मेच्या रात्री भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र भारतीय लष्कराने ते फोल ठरवले.
भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर अत्याधुनिक काउंटर-यूएएस उपकरणांचा यशस्वी वापर करण्यात आला.
या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे तब्बल ५० हून अधिक ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले असून कोणतीही ठोस हानी भारतीय बाजूस झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही गोळीबार सुरू केला असून भारतीय सैन्य त्यालाही ठाम प्रत्युत्तर देत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराची सजगता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.










Comments are closed