96
India Morning News
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना ‘आयसीस काश्मीर’ या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर गंभीर यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून, तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
गंभीर यांनी आपल्या कुटुंबीयांच्या तसेच जवळच्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. या प्रकाराला अत्यंत गांभीर्याने घेत, दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.या घटनेमुळे राजधानी दिल्लीत खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.






Comments are closed