Shopping cart

  • Home
  • News
  • नागपुर मध्ये कायदा व सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी सहा नविन पोलिस शाखांची निर्मिती करण्याचे पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश…!!

नागपुर मध्ये कायदा व सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी सहा नविन पोलिस शाखांची निर्मिती करण्याचे पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश…!!

April 10, 20251 Mins Read
932

India Morning News

Share News:
Share

निर्मिती प्रक्रिया गतिमान करा : मंत्री- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : दिनांक ९ एप्रिल :-
नागपुर शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था मजबुत करण्यासाठी राज्य सरकारने नागपुर ग्रामीण मध्ये सहा नविन पोलिस शाखांची निर्मिती करून महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे.नागपुर ग्रामीण व शहरातील वाढती लोकसंख्या व नविन वस्त्यांची निर्मिती लक्षात घेता. निर्देशित केलेल्या सहा पोलिस शाखांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विशेष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तुकडीसह नविन शाखांची निर्मिती व्हावी.यासाठी मुख्यमंत्री. महा. राज्य यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच पोलिस आयुक्त रविद्र सिंघल यांच्या उपस्थितीत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुचविलेल्या वडोदा , बाजारगांव , मोहपा , पाचगाव , नांद आणि कान्होली (बारा) या सहा ठिकाणी कायदा व सुव्यवस्था सुदृढ व मजबुत करण्यासाठी नविन पोलिस शाखांची निर्मिती करण्यात येणार आहे. या नविन पोलिस शाखांमुळे ग्रामिण भागातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांची भौतिक सुरक्षा लक्षात घेता. या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करून जलद गतिने ही शाखा नव निर्मितीचे चक्र राबवण्यात येणार आहेत. नागपुर ग्रामिण भागात गुन्हेगारीच्या आळा घालण्यासाठी आणि होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या भौतिक सुरक्षेसाठी तात्काळ पोलिस शाखांची गरज असल्याचे दिसुन येत असल्याचे प्रतिपादन करत. सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तुकडीसह प्रकल्पाला प्राधान्य देत आहोत. आणि या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. आमचे लक्ष्य हे पोलिस शाखांची निर्मिती होऊन लवकरात लवकर जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य करणे गरजेचे आहे. या द्वारे स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होईल. व राज्य सरकारच्या या निर्णयाप्रति जन-सामन्यात विश्वास दृढ होईल.

मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तत्काळ गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. असे त्या यावेळी म्हणाले व नविन सहा पोलिस शाखांच्या निर्मितीसाठी यावेळी महत्वाची पाऊले उचलण्यात आली.

या नविन शाखांच्या निर्मिती मुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यास मदत निश्चितच होईल.

नविन पोलिस शाखांच्या निर्मितीमुळे गावातील कौटुंबिक व सामुहिक वादातुन वाढणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राहील. नागपुर ग्रामिण भागातील कायदा व सुव्यवस्थेसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल. असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकार्‍यांना व कर्मचारी वर्गाला सांगत. या प्रकल्पाला प्राधान्य देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share