India Morning News
नागपुर : – आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्व आजूबाजूच्या परिसराचे योग वर्गाचे एकत्रीकरण व्हावे हा मागचा उद्देश होता . योग हा जीवन शैलीचा भाग आहे योगमुळे शारीरिक व मानसिक फायदा मिळतो शिवाय स्वभावामध्ये सकारात्मकता निर्माण होते . नियमित योग केल्याने औषधी पासून मुक्ती मिळू शकते . शक्ती योगाभ्यासी मंडळ , योगसंपदा शंख माऊली ग्रुप शक्तीमाता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना रचली होती . कार्यक्रमाचे अध्यक्ष रणदिवे सर तसेच वक्ता म्हणून डॉ .शेंद्रे व कविता रेवतकर उपस्थित होते .
समाधान सौख्याय निरोग त्वाय जीवने योगमेवाभ्यसते प्राज्ञ यथाशक्ती निरंतर जीवनामध्ये सूख समाधान पाहिजे असेल तर निरंतर योग यथा शक्तीनुसार केला पाहिजे शक्ती माता नगर पाण्याची टाकी येथे तेरा वर्ग एकत्रित येऊन योगा नृत्य योगासन आणि अनुभवाचा सराव सुंदर पद्धतीने करण्यात आला . योगा अभ्यास केल्याने बीपी , शुगर , गुडघे , दुखी , गॅस , पोटदुखी , तणाव चिडचिडापन आणि इतर आजार सुद्धा बरे होऊन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योग करा असे आव्हाहन ऋषीमुनी गेले यांनी केले आहे . कार्यक्रमात सर्वयोग शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . गुरुदेव स्पोर्ट्स अकॅडमी रामसर यांनी आपली लहान मुलांची टीम आणून योगा नृत्य चे सादरीकरण केले . खरबी रोड वरील सर्व वर्ग एकत्रित येऊन जनार्दन स्वामी की जय करा योग रहा , निरोग असे नारे लावत रॅली काढुन आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटात साजरा करण्यात आल . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन माधुरी बोंडे यांनी केले . या प्रसंगी कविता रेवतकर , रणदिवे सर , श्रावणे सर , भांगे सर , हटवार सर , थोटे सर , पराते सर , प्रकाश खोब्रागडे सह आदि नागरिक उपस्थित होते .








Comments are closed