India Morning News
मुंबई:
मुंबईच्या शांत रात्री गुपचूप पार पडलेल्या एका बैठकीने राज्याच्या राजकारणात हलचल निर्माण केली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा एकमेकांसमोर आले – आणि तोही कुठलाही औपचारिक कार्यक्रम नसताना. महिनाभरातली ही दुसरी भेट असल्याने, ‘पडद्यामागे काहीतरी शिजतंय का?’ असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट प्रशासकीय कामांसाठी झाली होती, असं सांगितलं जातंय. खुद्द बावनकुळे यांनीही “सांगली जिल्ह्याशी संबंधित विषयांवर चर्चा झाली,” असं स्पष्ट केलं. पण प्रश्न असा निर्माण होतोय की, केवळ विकासकामांवर चर्चा करायला विरोधी गटातले नेते अशा प्रकारे सलग भेटी घेतात का?
या भेटींच्या सावलीत एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील संभाव्य एकीचे संकेत शोधले जात आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या रणनीतीत ‘पवार गटाला जवळ करण्याचा’ डाव असल्याची कुजबूजही सुरू आहे.
राजकीय वर्तुळात असलेली ही चळवळ एखाद्या मोठ्या पुनर्रचनेचा इशारा देत आहे का? की सगळं केवळ योगायोग आहे?
‘राजकारणात काहीही निश्चित नसतं’ हे वाक्य पुन्हा एकदा खरी ठरतंय. पुढची पावलं काय असतील, हे पाहणं रंजक ठरणार आहे.










Comments are closed