Shopping cart

  • Home
  • Pune
  • मतदानाच्या दिवशीच कनिष्ठ अभियंता परीक्षा; परीक्षार्थींची मोठी अडचण, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

मतदानाच्या दिवशीच कनिष्ठ अभियंता परीक्षा; परीक्षार्थींची मोठी अडचण, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

November 25, 20251 Mins Read
Junior Engineer Exam
72

India Morning News

Share News:
Share

पुणे: येत्या १ डिसेंबर २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा आणि दुसऱ्याच दिवशी (२ डिसेंबर) राज्यातील अनेक नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान असल्याने हजारो परीक्षार्थी संकटात सापडले आहेत. परीक्षा व मतदान एकाच वेळी आल्याने अनेक उमेदवारांचा संविधानिक मतदानाचा हक्क धोक्यात आला आहे.

अनेक परीक्षार्थींना पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रे वाटप झाली आहेत. परीक्षा संपल्यानंतर ४०० ते ५०० किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्याच दिवशी आपल्या मतदारसंघात परत येऊन मतदान करणे अशक्य असल्याचे परीक्षार्थी सांगत आहेत. त्यातच काही उमेदवारांना निवडणूक ड्युटीही बजावावी लागणार असल्याने ते परीक्षेलाच मुकणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी सर्व परीक्षार्थींच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, सदर परीक्षा किमान एक आठवडा पुढे ढकलावी किंवा TCS iON च्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पुन्हा आयोजित करावी, जेणेकरून परीक्षेत पारदर्शकता राहील आणि उमेदवारांचा मतदानाचा हक्कही अबाधित राहील.

“मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत संविधानिक हक्क आहे. परीक्षार्थींच्या भविष्याबरोबरच लोकशाहीचाही मान राखला पाहिजे,” असे जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

या मागणीला राज्यभरातील हजारो परीक्षार्थींचा पाठिंबा मिळत असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share