Shopping cart

  • Home
  • News
  • शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना पोलीस उपअधीक्षकपदी थेट नियुक्ती

शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना पोलीस उपअधीक्षकपदी थेट नियुक्ती

April 22, 20250 Mins Read
551

India Morning News

Share News:
Share

मुंबई : मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना आज परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदी थेट नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीने शहीदांच्या कुटुंबियांप्रती शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि शहीद वीरांचे आहे, हे माझ्या नियुक्तीतून सिद्ध झाले.” त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

२६/११ च्या हल्ल्यात अंबादास पवार यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सरकारने त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचा हा प्रयत्न केला आहे. कल्पना पवार यांच्या नियुक्तीमुळे शहीदांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या देशसेवेचा वारसा पुढे चालवण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share