India Morning News
तीन आरोपी अटक , वाहनासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
कन्हान:- कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाने बोरडा टोल नाका जवळ नाकाबंदी करुन अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या पिकअप वाहनाला पकडले . कारवाईत पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन ५,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
रविवार (दि.२२) जुन रोजी रात्री दहा वाजता दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांना माहिती मिळाली कि , रामटेक वरुण पिकअप वाहना मध्ये अवैधरित्या अतिशय निर्दयतेने गोवंशाची कत्तलीकरीता वाहतुक होत आहे . अशा माहितीनुसार पोलीसांनी बोरडा टोल नाक्यावर नाकाबंदी करुन उभे असतांना महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र.एम एच ३७ टी २१२५ ही नागपुर- जबलपुर महामार्गाने मनसर कडुन येतांना दिसली. वाहनाला थांबवुन पाहणी केली असता वाहनात चार गोवंश जनावरे मिळुन आले . आरोपी शिवाजी सकाराम कुकडे (३६) , अमजद खान मंजुर खान पठाण (३६) , प्रदिप छगन इंगळे (२६) तीन्ही रा.आरेगाव ता.मेहकर जि. बुलढाणा यांना पोलीसांनी जनावरे वाहतुक परवाना विचारले तर त्यांनी कोणत्याही परवाना नसल्याचे सांगितले . जनावरे कत्तली करीता वाहतुक करीत असल्याची खात्री झाल्याने पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन त्याचा जवळुन चार गोवंश जनावरे किंमत ८०,००० रुपए आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन किंमत पन्नास हजार रुपये असा एकुण ५,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला . जप्त जनावरांची देखरेख व चारा पाणी करीता गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे रवाना करण्यात आले .
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, उपनिरीक्षक देशपांडे , हरिष सोनभद्रे , अमोल नागरे , जिवन विधे , मोहित झाडे सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .











Comments are closed