Shopping cart

  • Home
  • News
  • केदारनाथ धाम १०८ क्विंटल फुलांनी सजलं; २ मेपासून भाविकांना दर्शनाची मुभा,नोंदणी कशी कराल?

केदारनाथ धाम १०८ क्विंटल फुलांनी सजलं; २ मेपासून भाविकांना दर्शनाची मुभा,नोंदणी कशी कराल?

May 2, 20251 Mins Read
44

India Morning News

Share News:
Share

उत्तराखंड राज्यात पवित्र चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून, केदारनाथ मंदिराचे दरवाजे २ मे रोजी दर्शनासाठी उघडले जाणार आहेत. या आधी २८ एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले आहेत. तर बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे ४ मे रोजी उघडले जातील.

मंदिराला फुलांची आकर्षक सजावट –

केदारनाथ मंदिर यावर्षी १०८ क्विंटल फुलांनी अत्यंत देखणं सजवलं आहे. ऋषीकेश आणि गुजरात येथून आलेल्या फुलांनी मंदिर परिसर फुलवण्यात आला आहे. हे सौंदर्य पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

संपूर्ण तयारीत प्रशासन-

केदारनाथ मंदिरात २ मे रोजी सकाळी ७ वाजता परंपरेनुसार द्वार उघडले जातील. या वेळी रावल भीमाशंकर लिंग, मुख्य पुजारी बागेश लिंग, तसेच बद्री-केदार मंदिर समितीचे प्रमुख अधिकारी विजय प्रसाद उपस्थित राहतील. सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून भाविकांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली गेली आहे.

चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य-

चारधाम यात्रेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष नोंदणी आवश्यक आहे. registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाईटवर किंवा Tourist Care Uttarakhand अॅपवर नोंदणी करता येते. हेलिकॉप्टर प्रवासासाठी हेली यात्रा बुकिंग heliyatra.irctc.co.in या पोर्टलवर करता येईल.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share