India Morning News
आ.कृष्णा खोपडे यांचे निगम आयुक्तांना निवेदन
नागपूर : आगामी पावसाळा लक्षात घेता नालेसफाई, वेस्टवाटर लाईन व आय.आर.डी.पी. नाल्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर करण्याबाबत आमदार कृष्णा खोपडे यांनी निगम आयुक्त, तसेच सहाय्यक आयुक्त, म.न.पा. झोन क्रं. 5, 6, 7 व 8 यांना आज निवेदन दिले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, मागील वर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर्व नागपुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले, या पुरामुळे अनेक नागरिक हलकान झाले असून काही ठिकाणी कमरे इतके पाणी साचल्याचे लक्षात आले. त्यामुळे यावर्षी अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये, पाणी निकासी अगदी जलदगतीने व्हावी, याकरिता संबंधित झोनला तात्काळ प्रभावाने निर्देश देऊन सहायक आयुक्त व झोनचे आरोग्य अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी व पावसाळ्यात नागरिकांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेऊन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात यावे, असे निवेदनात नमूद आहे.









Comments are closed