India Morning News
तुमसर (१२ जून, भंडारा) : नगरपरिषद येथील आवारात स्वामी विवेकानंद वाचनालय अभ्यासिका उपलब्ध असून याठिकाणी सोय सुविधा पुरविण्यासाठी ग्रंथपालांना अनेकदा माहिती विद्यार्थ्यांनी दिली असूनही लक्ष देत नसल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी या वाचनालयात येत असतात. परंतु स्वामी विवेकानंद वाचनालयामध्ये ट्युबलाईट, फॅन व इतर काही विद्युत उपकरणे बंद पडले आहेत. सध्या उन्हाळा सुरू असून उष्णता अधिक प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे वाचनालयातील विद्यार्थ्यांना चक्कर व घबराट आले असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

त्यामुळे या वाचनालयात एक कुलर, फॅन, ट्युबलाईट व इतर आवश्यक साहित्य देण्यात यावे तसेच या अभ्यासिका ठिकाणी नियमितपणे स्वच्छता होत नसून घाण पसरली आहे त्यामुळे सौचालय व वाचनालय परिसरात स्वच्छता नियमित ठेवण्यात यावे. यासाठी याप्रकरणी जातीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना उचित निर्देश द्यावे, अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा प्यारेवाले यांना विद्यार्थ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमुख अमित एच मेश्राम, विद्यार्थी हर्षा सातपुते, पूजा बडवाईक, गायत्री बांते, ओमनी खेडकर, पूजा कहालकर, शीतल बोन्द्रे, प्रणाली भोयर, जान्हवी शहारे, रिंकू तिजारे, सपना शरणागत, तेजस्वी कहालकर, आचाल सेलोकर, नेहा वाडीभस्मे, दिव्या बोन्द्रे, कल्याणी चौधरी, पायल कांबळे, भारती शेंडे, जया कुंजेकर उपस्थित होते.











Comments are closed