India Morning News
मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र शासनाने यासंदर्भात महत्त्वाचा स्पष्टीकरण देत दिलासा दिला आहे.
योजनेतील ई-केवायसी अनिवार्य प्रक्रियेची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. अनेक महिलांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने तांत्रिक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेत अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
नोव्हेंबरचा हप्ता उशिरा मिळत असला तरी प्रशासनाने स्पष्ट केले की आचारसंहितेमुळे योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरची 1500 रुपयांची रक्कम डिसेंबरच्या हप्त्यासह जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी 3000 रुपये मिळू शकतात.
सरकारने इशारा दिला आहे की 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्यांचे पुढील हप्ते रोखले जाऊ शकतात. त्यामुळे लाभार्थींना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.







