India Morning News
नागपूर: दसऱ्याच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “लाडकी बहिण” योजनेबाबत मोठी घोषणा केली. काही दिवसांपासून योजना बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शिंदे यांनी स्पष्ट केले की ही योजना कायम सुरू राहणार असून महिलांना आर्थिक मदतीचा लाभ सातत्याने मिळत राहील. या घोषणेमुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“लाडकी बहिण” योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ६५ वर्षांखालील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये थेट खात्यावर जमा केले जातात. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. अलीकडेच लाभार्थ्यांचा फेरआढावा सुरू झाल्याने काही गैरसमज पसरले होते.
शिंदे यांनी जाहीर केले की, “ही योजना आमच्या सरकारची महिलांसाठी असलेली ठाम बांधिलकी आहे. गरीब बहिणींना आर्थिक आधार देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि ते कायम राहील.” त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी पसरवलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
यासोबतच शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत, शिवसेना (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. “उद्धव ठाकरे एका खुर्चीसाठी सर्व काही गमावले. कटकारस्थान करून ते पक्षातील कटप्रमुख झाले,” असा आरोप शिंदे यांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
शिंदे यांनी स्पष्ट केले की, महिलांच्या हितासाठी सरकार ठाम असून “लाडकी बहिण” योजना नियमितपणे सुरू राहणार आहे.







Comments are closed