Shopping cart

  • Home
  • News
  • मोहोळ पोलिस ठाण्यात कायदेविषयक शिबिर यशस्वी;मोफत विधी सेवेचा लाभ घ्या-न्यायाधीश सौ.गोवेकर

मोहोळ पोलिस ठाण्यात कायदेविषयक शिबिर यशस्वी;मोफत विधी सेवेचा लाभ घ्या-न्यायाधीश सौ.गोवेकर

May 8, 20250 Mins Read
293

India Morning News

Share News:
Share

मोहोळ: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तालुका विधी सेवा समितीच्या वतीने मोहोळ पोलिस ठाण्यातील सब जेलमध्ये कैद्यांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कैद्यांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी मोहोळ तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश सौ. पी. एस. गोवेकर होत्या. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील, तुरुंग अधिकारी सगेल, ॲड. के. बी. चौधरी, ॲड. आय. आर. पाटील, ॲड. सोनल जानराव, ॲड. आकाश कापूरे, ॲड. पी. एम. माने, ॲड. साईनाथ जगताप, कनिष्ठ लिपिक मिथुन भडंगे, विधी स्वयंसेवक अमोल महमूनी आणि सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य राजन घाडगे उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश सौ. गोवेकर यांनी कैद्यांना संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांची सविस्तर माहिती दिली. तसेच कायद्यापासून वंचित राहिलेल्यांसाठी मोफत विधी सहाय्य उपलब्ध असल्याचे सांगितले. “मोहोळ तालुक्यात विधी सेवा समिती कार्यरत आहे. मोफत विधी सेवेचा लाभ घेऊन आपल्या कायदेशीर हक्कांचे रक्षण करा,” असे आवाहन त्यांनी केले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share