Shopping cart

  • Home
  • Politics
  • महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ऑक्टोबरपासून मुहूर्त?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ऑक्टोबरपासून मुहूर्त?

June 23, 20251 Mins Read
253

India Morning News

Share News:
Share

मुंबई :-तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोग येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात निवडणुका न झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रशासन सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची टीका सातत्याने होत आहे. कोरोनानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया यामुळे निवडणुकांमध्ये अनेक वेळा विलंब झाला.

२०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण मान्य करत निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असली, तरी अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत.

आता निवडणुकांची चाहूल लागताच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये गेले आहेत. प्रचार आणि रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदा या दोन्ही निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकांचे औपचारिक वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share