India Morning News
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. यापूर्वी, सुप्रीम कोर्टाने आयोगाला 4 आठवड्यांत निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आयोगाने तयारी सुरू केली होती. अनेक महापालिकांमध्ये प्रभाग रचना जाहीर झाली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली.
मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर यांच्या मते, प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात मुंबई व नागपूर खंडपीठात दाखल याचिकांमुळे आयोगाने ही मुदतवाढ मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाचा अर्ज स्वीकारल्यास निवडणुका पुढे ढकलल्या जातील.
परंतु अर्ज फेटाळल्यास आयोगाला 4 आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम आहे. कोर्टाचा निर्णय या प्रक्रियेच्या भवितव्य ठरविणार आहे.









Comments are closed