India Morning News
मविआ कार्यकर्त्यांचा तुफान उत्साह; महायुतीला थेट आव्हान
मुंबई:महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (मविआ) आज मुंबईत ऐतिहासिक मोर्चा काढला. ‘मोर्चा फक्त झांकी, निवडणूक अजून बाकी!’ अशी घोषणा देत हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आझाद मैदान ते मंत्रालय असा हा मोर्चा महायुती सरकारविरोधात तीव्र संतापाचा स्फोट ठरला. हा मोर्चा इलेक्शन याद्यांच्या घोळ संदर्भात आहे.
मविआ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ‘महायुती हटाव, महाराष्ट्र वाचवा’च्या घोषणा दिल्या. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसी आरक्षण गोंधळ, कायद्याची ढासळती अवस्था असे मुद्दे उपस्थित करत मविआने महायुतीला थेट आव्हान दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हा मोर्चा सुरुवात आहे. जनता आता जागी झाली आहे. महायुतीच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध मतपेटीतून उत्तर मिळेल.” शरद पवार यांनी तर “जनतेच्या प्रश्नांवर सरकार गप्प आहे. मविआ जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असे सांगितले.
मोर्चात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा की पोलिसांना रस्ते नियंत्रणात ठेवणे कठीण झाले. मविआने आगामी निवडणुकीसाठी ‘जनजागरण अभियान’ जाहीर केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.










