Shopping cart

  • Home
  • News
  • बांधकाम कामगारांसाठी सरकारची मोफत ‘इसेन्शिअल किट’ योजना

बांधकाम कामगारांसाठी सरकारची मोफत ‘इसेन्शिअल किट’ योजना

November 5, 20251 Mins Read
महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी मोफत इसेन्शिअल किट वाटप
7

India Morning News

Share News:
Share

मुंबई : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलासादायक योजना सुरू केली आहे. ‘इसेन्शिअल किट योजना’अंतर्गत पात्र मजुरांना घरासाठी लागणाऱ्या १० अत्यावश्यक वस्तूंचा संच पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे.

या किटमध्ये दैनंदिन वापरातील उपयुक्त वस्तू — पत्र्याची पेटी, ब्लँकेट, बेडशीट, धान्य ठेवण्याचे डबे, प्लास्टिक स्टूल, साखर व चहाचे डबे, तसेच १८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर यांचा समावेश आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या घरखर्चात दिलासा मिळणार असून, त्यांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष आर्थिक फायदा होणार आहे.

किटमधील वस्तूंची यादी :
१. पत्र्याची पेटी
२. प्लास्टिक स्टूल
३. धान्य ठेवण्यासाठी कोठी
४. किलो क्षमतेचा धान्य डब्बा
५. बेडशीट (चादर)
६. ब्लँकेट (कंबल)
७. साखर ठेवण्यासाठी डब्बा
८. चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा
९. दुसरी चादर
१०. १८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर

अर्ज प्रक्रिया :
१. Google वर “Maha BOCW Profile Login” असे शोधा.
२. अधिकृत लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका.
३. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
४. लॉगिननंतर BOCW Registration Number जतन करा.
५. अधिकृत संकेतस्थळावर पुन्हा लॉगिन करून शिबिर व अपॉइंटमेंट तारीख निवडा.
६. ‘Print Appointment’ वर क्लिक करून पावती डाउनलोड करा.
७. ठरलेल्या दिवशी आधार कार्ड व पावतीसह शिबिर स्थळी हजर राहा.
८. तिथेच तुम्हाला १० वस्तूंचा इसेन्शिअल किट संच मोफत मिळेल.

जर स्लॉट भरले असतील, तर १५ दिवसांनी पुन्हा अर्ज करता येईल.

महत्त्वाचे:
ही योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी लागू आहे. पात्रता अटी पूर्ण न केल्यास अर्ज नाकारला जाईल.

राज्य सरकारची ही योजना बांधकाम मजुरांच्या घरगुती गरजा भागवणारी आणि आर्थिक स्थैर्य देणारी ठरणार आहे. अनेक मजुरांसाठी ही ‘इसेन्शिअल किट योजना’ म्हणजे घरातला दिलासा ठरली आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share