Shopping cart

  • Home
  • News
  • महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

May 9, 20251 Mins Read
249

India Morning News

Share News:
Share

• मौदा व कामठी तालुक्यातील गावं मेट्रो सेवेशी मनपा फीडर बस सेवेद्वारे जुळणार

• १२ मे रोजी फिडर सेवेचं रीतसर उदघाटन

नागपूर: महामेट्रो व नागपुर महानगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. महामेट्रोचे पूर्वेकडील प्रजापती नगर स्टेशन मौदा व कामठी तालुक्यातील आजुबाजुची गावांशी मनपा फीडर बसद्वारे जोडली जाणार आहेत. या गावातील लोकांना मेट्रोस्टेशन पर्यंत पोहचण्याची व्यवस्था नव्हती तसेच बस सेवा सुद्धा आवश्यक त्याप्रमाणात उपलब्ध नव्हती. सर्व गावांच्या सरपंचांनी व नागरिकांनी मेट्रोसेवा उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही मागणी केली होती. महा मेट्रो नागपूर शहरातील सर्वच भागात तसेच शहरा लगतच्या भागात उत्तम, आरामदायक, किफायतशीर, प्रवासी सेवा देण्यात कटीबद्ध आहे असून महा मेट्रो प्रशासनाच्या वतीने नागपूर महानगरपालिका सोबत समन्वय साधत सदर “फीडर बससेवा” सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या संबंधाने मेट्रो भवन येथे नुकतेच महामेट्रोचे मल्टीमोडल इंटिग्रेशन विभागाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक श्री. महेश मोरोणे आणि मनपाचे शहरबस सेवा ऑपरेशन्स मॅनेजर श्री.राजीव घाटोळे आणि दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली व त्यात सदर फीडर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला .

सोमवार दिनांक १२ मे रोजी सकाळी ८. ३० वाजता संबंधित गावांचे सरपंच व उपसरपंच यांचे उपस्थितीत प्रजापती नगर मेट्रो स्टेशन परिसरात सदर फीडर बस सेवेचा शुभारंभ होणार असून लिहीगावच्या सरपंच श्रीमती अस्मिता खांडेकर, उपसरपंच श्री मुकेश हिवसे तसेच घोरपड-शिरपूर गटग्रामपंचायततीचे तारा कडू व उपसरपंच श्री अनिकेत वानखेडे या वेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.या फिडर बस सेवेमुळे कामठी तालुक्यातील भरतवाडा, पावनगाव ,शिरपुर, घोरपड, काडोली तसेच मौदा तालुक्यातील वाडद व इतर काही गावे फीडर सेवेद्वारे मेट्रोशी जोडले जाणार आहेत.

उल्लेखनीय आहे कि, यापूर्वी सुद्धा महा मेट्रोने मनपाचे सहकार्याने मिहान येथील सर्वच कंपन्यांसाठी १० विशेष एसी एसी बसेस खापरी मेट्रो स्टेशनवरून सुरु केलेल्या आहेत. एम्स व नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटसाठी सुद्धा खापरी स्टेशन पासुन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच विमानतळ पासून एअरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत एसी ई-बस द्वारे काँनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रजापती नगर स्टेशन पासून वाठोडा येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी,साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन पासून पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी तसेच धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन पासून अमरावती रोड वरील नागपूर विद्यापीठ परिसरासाठी विशेष फीडर सेवा सुरू करण्यात आली असून या सगळ्या घडामोडींमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये देखील वाढ होत आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share