Shopping cart

  • Home
  • News
  • उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळला! अकोल्यात पारा 45 अंशांवर, राज्यभर चाळीशी पार

उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळला! अकोल्यात पारा 45 अंशांवर, राज्यभर चाळीशी पार

April 18, 20250 Mins Read
76

India Morning News

Share News:
Share

पुणे: महाराष्ट्रात सध्या उष्णतेच्या लाटेने थैमान घातले असून, अकोला येथे तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ४० अंशांहून अधिक नोंदवले गेले असून, नागरिकांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती आहे. अकोल्यात बुधवारी कमाल तापमान ४३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर गुरुवारी यात वाढ होऊन पारा ४५ अंशांवर पोहोचला. मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही भागातही तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास आहे.

हवामान खात्याचा इशारा

प्रादेशिक हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देत नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. हलके कपडे, पुरेसे पाणी पिणे आणि सावलीत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने नमूद केले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share