Shopping cart

  • Home
  • News
  • तहसील पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : एम.डी. पावडर बाळगणाऱ्या इसमास अटक

तहसील पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : एम.डी. पावडर बाळगणाऱ्या इसमास अटक

May 1, 20250 Mins Read
56

India Morning News

Share News:
Share

नागपूर — तहसील पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका इसमाकडून एम.डी. (मेथेड्रोन) प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १ मे रोजी पहाटे २.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

तहसील पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, टिमकी, भानखेडा येथील गुप्ता आटा चक्कीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर इंदुबाई ढेकणे यांच्या घरासमोर एक इसम बर्गमॅन गाडीशेजारी उभा असून त्याच्याकडे एम.डी. पावडर आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच सदर इसम पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव शकील अहमद अब्दुल खालीद (वय ३४, रा. लाल शाळेजवळ, तकीया दिवानशाह, तहसील, नागपूर) असे असल्याचे निष्पन्न झाले.

त्याची झडती घेतली असता, त्याच्या पॅंटच्या उजव्या खिशात झिपलॉक पिशवीमध्ये ७.२६ ग्रॅम एम.डी. पावडर सापडली, ज्याची बाजारभावातील अंदाजित किंमत ७२,६०० रुपये इतकी आहे. तसेच त्याच्याकडून मोबाईल फोन व बिनाक्रमांकाची बर्गमॅन दुचाकी असा एकूण १,५२,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी एम.डी. पावडर विक्रीसाठी बाळगल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. अ‍ॅक्टच्या कलम ८(क), २१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (परि. क. ३) महक स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग) अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कार्यवाहीत वपोनि. श्रीमती शुभांगी देशमुख, पोउपनि. रसुल शेख, सफौ. राजेश ठाकुर, पोहवा. रामकैलास यादव, पोअं. युनुस खान व फिरोज खान यांचा मोलाचा सहभाग होता.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share