India Morning News
महाराष्ट्रात नक्षलमुक्तीसाठी मोठे पाऊल; सोनू उर्फ भूपतीसह 60 हून अधिक माओवादी शरणागत!
गडचिरोली – महाराष्ट्रातील नक्षलवाद समाप्तीसाठी एक ऐतिहासिक घडामोड झाली आहे. माओवादी नेते मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आपल्या 60 हून अधिक सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या घटनेमुळे राज्यातील माओवादी सशस्त्र चळवळीवर मोठा आघात बसला असून, शांततेकडे वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शरणागत माओवाद्यांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द केली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक शरणागतास संविधानाची प्रत देऊन राज्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
1980 पासून गडचिरोली परिसरात सक्रिय असलेली माओवादी चळवळ अनेक सामान्य नागरिकांच्या जीवाला कारणीभूत ठरली होती. मात्र भूपतीने सशस्त्र संघर्ष सोडून शांततेचा मार्ग स्वीकारल्याने आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याने, नक्षलवाद कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.
भूपतीने शरणागती देण्यापूर्वी अट ठेवली होती की तो फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच आत्मसमर्पण करेल. त्यानुसार, मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीला पोहोचले आणि शरणागत माओवादींचे स्वागत केले.
राज्यातील पोलीस प्रशासन आणि मध्यस्थांच्या प्रयत्नांमुळे या माओवादी कार्यकर्त्यांना समाजात पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल टाकले गेले आहे.










Comments are closed