India Morning News
पुणे: प्रतिष्ठित ‘संसद रत्न’ पुरस्कार राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांनी निवड समिती तसेच प्राईम पॉईंट फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली होती.
मेधा कुलकर्णी यांनी आपल्या कृतज्ञता संदेशात म्हटले, “माझ्या कार्याची दखल घेऊन मला हा सन्मान जाहीर झाला, याचा मला अतिशय आनंद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून राज्यसभेत प्रतिनिधित्वाची संधी दिली, यासाठी मी त्यांची आभारी आहे.”
राज्यसभेत विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून केलेली कामे आणि विविध विषयांवर मांडलेल्या विचारांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. “पक्षातील शीर्ष नेतृत्व, सहकारी आणि मला प्रोत्साहन व आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते,” असेही त्यांनी नमूद केले.










Comments are closed