Shopping cart

  • Home
  • News
  • आदिवासी गोवारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आदिवासी गोवारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

June 30, 20251 Mins Read
191

India Morning News

Share News:
Share

पवनी :- आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाऊंडेशन रामटेक द्वारे आदिवासी गोवारी समाजातील दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पवनी येथील अपलोना गोंटूल आदिवासी सभागृहात रविवार (दि.२९) रोजी आयोजित करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र अध्यक्ष कैलाश राऊत , प्रमुख पाहुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले , साप्तहिक आदिवासी वार्ता चे संपादक शेखर लसुते ,आदिवासी गोवारी स्मारक समितीचे उपाध्यक्ष चिंतामण वाघाडे सह आदि मान्यवरांचा हस्ते संत भाकरे महाराज , खोडे खोडवान , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिवीर बिरसा मुंडा , क्रांतीजोती सावित्रीबाई फुले , आदिवासी रत्न मोतीरावन कांगाली यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . विद्यार्थांनी जिद्द , चिकाटी , संयम , सहनशीलता व एकाग्रता ठेऊन यशाची पायरी चढता येते , त्यात गरीब परिवारातील विद्यार्थी सुद्धा यशस्वी झाले आहेत . रडत बसण्यापेक्षा केव्हाही लढत राहणे आवश्यक आहे . एक ना एक दिवस आपण आपल्या कार्यात यशस्वी होऊ असे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक ज्ञानेश्वर नेवारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले . यावेळी शिक्षक जीवन राऊत सर यांनी सुद्धा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या .

बारावीतील प्रथम पारितोषिक क्षितिज वाघाडे , द्वितीय नम्रता मुर्खे , तृतीय आदित्य नेवारे यांना
शिल्ड व पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला . दहावी मधील गुणवंत विद्यार्थी मध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी नेवारे , द्वितीय क्रमांक चेतना चौधरी , तृतीय क्रमांक क्रिश नेवारे यांना शिल्ड व पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

या सत्कार सोहळ्यात आदिवासी गोवारी(गोंड गोवारी) फाऊंडेशन चे अध्यक्ष भास्कर राऊत , ज्येष्ठ समाज सेवक प्रभाकर नेवारे , माजी नगरसेवक अनिल ठाकरे , बलधारी नेवारे , फागण नेवारे , आनंद शहारे , जगदीश शेंद्रे , रवी देव्हारे , मनोहर सोनवणे , सुखदेव शेंद्रे , उमेश राऊत , सतीश गाडे , ब्रम्हानंद नेवारे , रवींद्र कोहळे , सुनील नेवारे , सुरेश शेंद्रे , टेकलाल नेवारे , बाळु सोनवणे , राजू बाबा कवरे , कृष्णा सहारे , ममता राऊत , लक्ष्मी राऊत , लेखिका कोहळे सह विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमाचे संचालन आनंद शहारे व प्रास्ताविक जीवन राऊत सर तर आभार आदिवासी गोवारी (गोंड गोवारी)फाऊंडेशन , रामटेक चे सचिव नंदकिशोर कोहळे यांनी मानले .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share