Shopping cart

  • Home
  • Pune
  • मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट : पुण्याला १००० ई-बस मंजूर

मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट : पुण्याला १००० ई-बस मंजूर

November 11, 20251 Mins Read
e buses approved for Pune
90

India Morning News

Share News:
Share

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश ; अवजड उद्योग मंत्री कुमारस्वामी यांचे शिक्कामोर्तब

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ई-बस खरेदीला मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अंतिम मंजुरी दिल्याने लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात या बस दाखल होतील. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम होऊन वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच प्रदूषण नियंत्रणात मदत होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पीएमपीएमएलकडे सध्या २००० बस आहेत, त्यातील ७५० स्वमालकीच्या तर उर्वरित ठेकेदारांच्या. पुणे-पिंपरी चिंचवडचा विस्तार व लोकसंख्या वाढ लक्षात घेता किमान तीन हजार बस आवश्यक आहेत. यासाठी मोहोळ यांनी केंद्र व राज्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला निधी पत्र पाठवले.

पीएमपीएमएलमार्फत प्रस्ताव केंद्राकडे गेला. पंधरा दिवसांपूर्वी मोहोळ यांनी कुमारस्वामी यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली.

पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक भक्कम करण्यावर आमचा भर आहे. सध्या शहरात ३२ किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू आहे, पण ई-बस येण्याने मोठा दिलासा मिळेल, असे मोहोळ म्हणाले.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share