India Morning News
मुंबई: दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. 20 वर्षीय अपंग आणि मानसिकदृष्ट्या मर्यादित असलेल्या युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी BNS कलम 64 (2) (i) आणि 64 (2) (k) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
युवतीने दिलेल्या माहितीनुसार 10 हून अधिक संशयितांची डीएनए चाचणीसाठी रक्त नमुने घेतले गेले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 32 वर्षीय विवाहित व्यक्तीला अटक केली असून, 17 वर्षीय अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले आहे.
घटना त्या वेळी उघडकीस आली, जेव्हा युवतीने आपल्या आजीला पोटदुखीची तक्रार केली आणि वैद्यकीय तपासणीत ती सुमारे 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळवून तपास सुरू करण्यात आला.
युवतीच्या स्थितीमुळे चौकशी कठीण होती. त्यामुळे पोलिसांनी एका NGO च्या मदतीने ‘ड्रॉइंग आणि फिंगर डॉल थेरपी’ च्या माध्यमातून संवाद साधला. या प्रक्रियेदरम्यान युवतीने संशयितांची नावे सांगितली आणि पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.
तपासात आणखी उघड झाले की सुरुवातीला पीडितेच्या वडिलांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता. परंतु पोलिस आणि NGO च्या समजावणीनंतर त्यांनी सहकार्य केले. पोलिसांनी सांगितले की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, तपास आता वैज्ञानिक पुरावे, डीएनए अहवाल आणि काउंसलिंग अहवालांवर आधारित राबवला जात आहे.










Comments are closed