India Morning News
नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४ व ५ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसाठी असून विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करतील. ते ‘संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही आणि महानगरपालिका राजकारण’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
पहिल्या दिवशी विवेक वेलणकर ‘शहरी प्रश्न, सक्रियता आणि राजकारण’ या विषयावर भाष्य करतील. संग्राम खोपडे सत्र संचलन करतील, तर आशितोष शिर्के, राजू भिसे आणि खोपडे ‘आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण’ या विषयावर चर्चा करतील. घरपट्ट्यांची चळवळ आणि भविष्यातील कार्यक्रमांवरही विचारमंथन होईल.
दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत मार्गदर्शन करतील. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटीव आणि लोकचळवळींवर चर्चा होईल.
या कार्यशाळेमुळे स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेसच्या रणनीतीला बळकटी मिळणार आहे.








Comments are closed