Shopping cart

  • Home
  • News
  • नागपुरात हाय अलर्ट; संघ मुख्यालयासह पोलिसांची कडक सुरक्षा

नागपुरात हाय अलर्ट; संघ मुख्यालयासह पोलिसांची कडक सुरक्षा

November 11, 20250 Mins Read
Nagpur Police tighten security around RSS headquarters after Delhi blast
103

India Morning News

Share News:
Share

नागपूर: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर नागपूर शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून, संघ मुख्यालय, रेल्वे स्थानक, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल येथील मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळ या ठिकाणी सुरक्षेचा विशेष आढावा घेण्यात आला. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्यालय परिसराला भेट देऊन केंद्रीय सुरक्षा दलांशी चर्चा केली.
संघ मुख्यालयात आधीपासूनच २४ तास सुरक्षा असली तरी, आता परिसरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिस तपासणी अधिक काटेकोर करण्यात आली आहे.

रेल्वे व बस स्थानकांवरही गस्त वाढवली
रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठा आणि मॉल्ससह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी काटेकोरपणे केली जात असून, गुप्तचर विभागाने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले आहे. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित भागातही विशेष सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकारी आणि ठाणेप्रमुखांना सतत गस्त आणि देखरेख वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, “नागपूर जिल्हा पोलीस यंत्रणा पूर्णपणे अलर्टवर आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share