Shopping cart

  • Home
  • News
  • नागपूर हे राज्याचे “ग्रोथ सेंटर”;महाराष्ट्र दिनानिमित्त आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे विधान

नागपूर हे राज्याचे “ग्रोथ सेंटर”;महाराष्ट्र दिनानिमित्त आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे विधान

May 1, 20250 Mins Read
49

India Morning News

Share News:
Share

मनपा मुख्यालयात ध्वजारोहण

नागपूर : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आपल्या भाषणात डॉ. चौधरी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागपूरकरांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली.

ते म्हणाले की, महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्राम, सामाजिक सुधारणा, साहित्य, विज्ञान, कला व उद्योग क्षेत्रात नेहमीच अग्रणी भूमिका बजावली आहे. राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असून, या प्रगतीत नागपूरची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर हे राज्याचे “ग्रोथ सेंटर” असल्याचे सांगत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

समारंभात अग्निशमन दलाचे जवान, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि तेजस्विनी महिला मंचाच्या किरण मुंधडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share