Shopping cart

  • Home
  • News
  • नागपूर मनपा सक्तीत; पुन्हा पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नागपूर मनपा सक्तीत; पुन्हा पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

June 27, 20251 Mins Read
42

India Morning News

Share News:
Share

नागपूर :- शहरातील स्वच्छता यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुन्हा एकदा कारवाईचे सत्र सुरू केले आहे. लक्ष्मीनगर झोनच्या वार्ड क्रमांक १६ मधील सोमलवाडा हजेरी स्टँडवर गैरहजर असलेल्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या आधीही मनपाने अनुपस्थित राहिलेल्या ९६ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. सध्या पावसाळा सुरू असल्याने शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात असून, वसुमना पंत स्वतः अचानक हजेरी स्टँडवर पाहणी करत आहेत.

सोमलवाडा येथे एकूण २१ स्वच्छता कर्मचारी नियुक्त असताना, प्रत्यक्ष पाहणीवेळी केवळ १६ कर्मचारीच उपस्थित आढळले. उर्वरित पाचजण कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर होते, ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

या कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत खुलासा करावा लागणार असून, अपयश असल्यास त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा वसुमना पंत यांनी दिला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांना संबंधित कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे.

शहराच्या स्वच्छतेस कोणताही धोका निर्माण होऊ नये, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अन्यथा कठोर निर्णय घेणे अपरिहार्य आहे,असे पंत यांनी स्पष्ट केले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share