Shopping cart

  • Home
  • Politics
  • नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; महिलांना मोठं प्रतिनिधित्व

नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; महिलांना मोठं प्रतिनिधित्व

November 11, 20251 Mins Read
नागपूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
64

India Morning News

Share News:
Share

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (11 नोव्हेंबर) सकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीनंतर महापालिकेचं नवीन राजकीय चित्र समोर आलं असून, महिलांना पुन्हा एकदा मोठं प्रतिनिधित्व मिळालं आहे.

एकूण 151 नगरसेवकांच्या जागांपैकी 76 जागा महिलांसाठी, तर 75 जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच नागपूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आज झालेल्या सोडतीनंतर इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवकांमध्ये नवीन समीकरणं आणि बदलांच्या चर्चा रंगल्या आहेत.

महानगरपालिकेतील एकूण जागांचे चित्र:

  • एकूण जागा: 151

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 69

  • ओबीसी (इतर मागास प्रवर्ग): 40

  • अनुसूचित जाती (SC): 30

  • अनुसूचित जमाती (ST): 12

महानगरपालिकेत 38 प्रभाग असून, त्यापैकी 37 प्रभागांत प्रत्येकी 4 नगरसेवक आणि 38व्या प्रभागात 3 नगरसेवक असतील.

अनुसूचित जाती (SC) महिला राखीव प्रभाग: 2 अ, 4 अ, 5 अ, 6 अ, 7 अ, 10 अ, 12 अ, 14 अ, 17 अ, 24 अ, 25 अ, 29 अ, 30 अ, 32 अ, 37 अ
अनुसूचित जमाती (ST) महिला राखीव प्रभाग: 8 अ, 13 ब, 14 ब, 20 ब, 21 अ, 34 ब

राजकीय हालचालींना आता वेग आला असून, सर्व पक्ष उमेदवार निवडीच्या तयारीत आहेत. आरक्षण बदलल्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत.

तज्ज्ञांच्या मते, या आरक्षण सोडतीमुळे नागपूरच्या राजकीय नकाशात मोठा फेरबदल होईल. महिलांसाठी वाढलेली आरक्षण संख्या महिला नेतृत्वाला बळ देणारी ठरेल, आणि शहराच्या विकासाच्या नव्या दिशा ठरवण्यास मदत करेल.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share