India Morning News
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या निवडणुकीत जिल्ह्यातील २७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी ७.३२ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी एकूण ८९१ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, सर्व तांत्रिक व प्रशासकीय व्यवस्था पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक नगरपरिषदेकरिता एक निर्णय अधिकारी आणि एक सहायक अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी ४,४५५ कर्मचारी तैनात राहणार आहेत. तसेच ईव्हीएम यंत्रसामग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले की, मतदान पारदर्शक, शांततामय आणि शिस्तबद्ध पार पडावे यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.





