India Morning News
नागपूर: मराठवाड्यातील पूरपरिस्थितीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. या संकटात मदत करण्यासाठी नागपूरच्या तायवाडे महाविद्यालय, फिनिक्स अकॅडमी, करिअर कट्टा आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी संयुक्तपणे आपत्ती मदत निधी संकलन मोहीम राबवली. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. ते म्हणाले, “अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित होतात.”

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य शरयूताई तायवाडे, फिनिक्स अकॅडमीचे प्रदीप कमाले, डॉ. वर्षा वैद्य, डॉ. शरद डवरे, डॉ. कमलेश डाबरे, डॉ. योगेश खैरे, डॉ. गजानन पोलनवार, डॉ. चंद्रकांत भास्कर, डॉ. राहुल वाघमारे, डॉ. मारोती वाघ, डॉ. मंजुषा मामीडवार, डॉ. अभिविलास नखाते, इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा हा सामाजिक दायित्वाचा भाव समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.










Comments are closed