India Morning News
नांदेड : शहराला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ 7 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच इंग्रजी माध्यमातील शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याचा प्रकार 19 नोव्हेंबरला समोर आला. मुलीने अचानक शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी विचारपूस केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली.
भाग्यनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 65(2), 351(2) आणि POCSO कलम 468 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.
घटनेनंतर नांदेडमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी विनंती पोलिसांकडून न्यायालयात केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली.
या अमानुष प्रकारामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा गंभीरपणे पुढे आला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










