Shopping cart

  • Home
  • News
  • नारायण राणे आता पुणेकर! भोसलेनगरात नव्या घराची वास्तुशांती

नारायण राणे आता पुणेकर! भोसलेनगरात नव्या घराची वास्तुशांती

May 17, 20250 Mins Read
550

India Morning News

Share News:
Share

पुणे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुणे शहरातील भोसलेनगर येथे नवीन निवासस्थान झाले आहे. आज या नव्या घराची वास्तुशांती संपन्न झाली. यानिमित्त माजी खासदार संजय काकडे यांनी पत्नी उषा यांच्यासह राणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संजय काकडे यांनी राणे यांच्याशी असलेल्या २८ वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करताना म्हटले, “राणे साहेबांचे रोखठोक आणि दिलदार व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वपरिचित आहे. कमी कालावधीत मुख्यमंत्रिपद भूषवताना त्यांनी केलेल्या कामांमुळे ते लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. कोकणापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना बळ आणि प्रेम दिले आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण राज्यात पसरलेला आहे.”

वास्तुशांतीनिमित्त झालेल्या भेटीत काकडे आणि राणे यांच्यात राजकीय, सामाजिक तसेच उद्योगविषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. राणे यांचे पुण्यात नवे घर झाल्याने ते आता पक्के पुणेकर झाले आहेत. काकडे यांनी त्यांना उत्तम गृहसौख्य लाभावे, अशी शुभकामना दिली.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share