Shopping cart

  • Home
  • News
  • भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त; लाहोरमध्ये एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला

भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त; लाहोरमध्ये एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला

May 8, 20251 Mins Read
260

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या रडार सिस्टिमला मोठा धक्का दिला असून, पाकिस्तानी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यावर त्याची लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली आहे. काल रात्री अमृतसरच्या आसपास पाकिस्तानने पुन्हा एकदा मिसाईल सोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताने तत्काळ कारवाई करत त्याची प्रतिक्रिया दिली.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकीकडे शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे सुरूच ठेवले आहे, तर दुसरीकडे भारतीय लष्कराने त्याच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर चांगली प्रहार केला आहे. पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय सैन्याच्या कडवी प्रतिक्रिया आणि तत्परतेमुळे पाकिस्तानची लाहोरमधील रक्षा प्रणाली चांगलीच उद्ध्वस्त झाली आहे.

या घटनेनंतर, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि भारतीय लष्कर अधिक सावध झाले असून, सध्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून पाकिस्तानला ठोस संदेश दिला आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share