India Morning News
तुमसर : तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणावर रोपटी नष्ट झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ५० हजार रोपेपैकी सुमारे २६ हजार रोपटींचा नाश झाल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर परिणाम झाला आहे. ही रोपवाटिका जंगलवाढीसाठी महत्त्वाची असून या नाशामुळे मोठा आर्थिक आणि पर्यावरणीय तोटा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत चंद्रपूर विभागीय वन अधिकारी बापू येळे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवार रोजी दुपारी २.१५ वाजता डोंगरला येथील रोपवाटिकेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा उईके, नितेश धनविजय, वनपाल शामदेव उके, वनरक्षक लक्ष्मण जावळगे यासह संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मौकास्थळी हजर राहून घटनेविषयी माहिती सादर केली. यावेळी तक्रारकर्ता तथा शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित मेश्राम मौकास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनसंरक्षक, चौकशीत सहभागी झाले आणि नुकसानाचे नेमके कारण, जबाबदारी आणि पुढील उपाययोजना ठरविण्यात आले.
या रोपवाटिकेतील रोपटींचा उपयोग वृक्षलागवडीसाठी होत असल्याने पर्यावरणासाठी ही मोठी हानी मानली जात आहे. याप्रकरणात सखोल चौकशी करून वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
५० हजार झाडांची लागवड करण्याचा दावा येथे करण्यात आला त्यापैकी २६ हजार झाडे ही माकडांनी खाल्ली हे हास्यस्पद आहे. शासकीय निधीच्या दुरुपयोग आहे या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
अमित एच मेश्राम, विभागप्रमुख, शिवसेना ठाकरे पक्ष, जिल्हा भंडारा.
सामाजिक वनीकरण डोंगराला येथील प्रकरणात आपल्याकडे असलेले संपूर्ण पुरावे, फोटो व दस्तावेज मला लेखी बयानसहित लवकरात लवकर द्यावे, जेणेकरून चौकशी करण्यास सोईचे होईल.
– बापू येळे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण चंद्रपूर.













Comments are closed