India Morning News
प्रभाग ५ व ७ च्या भाजप उमेदवारांसाठी एकजूट
पंढरपूर:नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोनार समाजाच्या बांधवांना एकत्र आणत प्रभाग क्रमांक ५ व ७ साठी संयुक्त ‘घोंगडी बैठक’ आयोजित करण्यात आली. “हा विश्वास, हा भाव… ऊर्जा आहे कार्याची!” या भावनेने भारलेल्या या बैठकीत समाजाला भाजप आणि महायुतीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते. त्यांनी पंढरपूरच्या भावी विकासाचे स्वप्न उभे करताना सोनार समाजाच्या योगदानाचे कौतुक केले आणि महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी सोनार समाजाचे श्रद्धास्थान आदरणीय मदन महाराज हरिदास यांच्यासह समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण मंजरतकर मेंबर, समाजाचे अध्यक्ष जगदीश जोजारे, भाजप नेते अक्षय वाडेकर,माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, प्रभाग ५ व ७ चे अधिकृत भाजप उमेदवार तसेच समाजातील सर्व मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घोंगडी बैठकीने सोनार समाजात प्रचंड उत्साह निर्माण केला असून, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा पाठबळ मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.





