Shopping cart

  • Home
  • Politics
  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महाराष्ट्रात स्वागत

स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महाराष्ट्रात स्वागत

May 6, 20250 Mins Read
507

India Morning News

Share News:
Share

चौंडी: गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रतीक्षा करणाऱ्या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आशा आज सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने पूर्ण झाल्या. लोकशाहीला बळकट करणारा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आनंदाची लाट घेऊन आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान हा निर्णय जाहीर झाला, ज्यामुळे या पावन भूमीचा मान आणखी वाढला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले, “हा निर्णय कार्यकर्त्यांच्या हक्काचा सन्मान आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या मूल्यांना पाठबळ दिले आहे. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंदाचे हास्य फुलले आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला पाठबळ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी कायदेशीर सल्लामसलत आणि नियोजन केले. या निवडणुका राज्याच्या विकासाला नवी गती देणार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदेतज्ज्ञांशी सातत्याने चर्चा करून हा मार्ग प्रशस्त केला. त्यांच्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झाले,” असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने नुकताच जातीनिहाय जनगणनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जनतेच्या आकांक्षांना बळ मिळाले आहे. सरकार आणि न्यायालयाच्या समन्वयाने सामाजिक न्याय आणि विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी ठरणार आहेत. “तन, मन, धन अर्पण करून समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा विजय आहे. त्यांच्या मेहनतीला आता न्याय मिळेल,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात उत्साह संचारला असून, लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share