India Morning News
पुणे: जन्मजात कर्णबधिर मुलांवर उपचार करणाऱ्या कॉक्लिआ संस्थेला आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी २ मेपासून तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. बालगंधर्व कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनात प्रसिद्ध छायाचित्रकार बाळा नाम्बियार यांनी टिपलेली छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (२ मे) सकाळी १०:३० वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ, बालसाहित्यकार व भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अरुण देहाडराय, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे विलास जावडेकर आणि क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष अरविंद जैन यांच्या हस्ते होणार आहे.
कर्णबधिर मुलांच्या समस्येबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्यावरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन रविवार (४ मे) पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती कॉक्लिआ संस्थेचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी पत्रकार परिषदेत दिली.






Comments are closed