Shopping cart

  • Home
  • News
  • मिटेवाणी येथे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दोन आरोपींना अटक

मिटेवाणी येथे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दोन आरोपींना अटक

September 22, 20251 Mins Read
414

India Morning News

Share News:
Share

मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

तुमसर : प्रकरण अशा प्रकारे आहे की, जखमी नामे राकेश पटले वय ३८ वर्षे हे पोलीस स्टेशन तुमसर येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असुन दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता ते ११.०० वाजेच्या सुमारास घटना मौजा मिटेवानी येथील आस्था बार येथे दारु पिण्याकरीता गेले असता, तिथे आरोपी दिनेश राठोड, वय अंदाजे ३५ वर्ष, दिप शामकुवर, वय अंदाजे ३४ वर्ष व दोन अनोळखी ईसम हे सुद्धा दारु प्यायला आले असता दारु पिउन झाल्यावर जखमी राकेश पटले हे कॉऊन्टरवर बिल देण्याकरीता आले त्याचवेळी तिथे आरोपी दिनेश राठोड हा सुद्धा बिल देण्याकरिता आला असता, त्याचे मोबाईल खाली पडल्याने जखमीने त्याला त्याचे मोबाईल उचलुन दिले तेव्हा आरोपी दिनेश राठोड, याने “तु माझा मोबाईल काऊन उचललास” या कारणावरुन झगडा भांडण करुन कार्केटरवरील काचेचे ग्लासने डोक्यावर, हनुवटीवर, व डोळ्याखाली मारुन जखमी केले तेव्हा जखमीचा मित्र दुर्गेश सांडेकर हा वाचवण्याकरीता मधात आला असता त्याला सुद्धा आरोपी दिनेश राठोड याने काचेचा ग्लास डोक्यावर मारुन जखमी केले त्यानंतर आरोपी सोबत असलेले आरोपी दिप शामकुवर यांच्यासह इतर दोन आरोपी यांनी दोन्ही जखमीस हाताबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन तेथुन पळून गेले. अशा जखमीच्या तोंडी बयाना वरुन नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन तुमसर येथे अपराध क्र. 635/2025 कलम 352, 115(2), 118(1), 3(5) BNS 2023 अन्वये सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्ह्यातील आरोपी दिनेश राठोड व दिप शामकुवर यांना ताब्यात घेवुन दिनांक २२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आले आहे. यामध्ये ईतर दोन आरोपींचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मुंडे पोलीस स्टेशन तुमसर हे करीत आहेत. या घटनेत बेदम मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी राकेश पटले यांना उपचारासाठी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share