Shopping cart

  • Home
  • Politics
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईत जेएन पोर्ट फेज-2 चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईत जेएन पोर्ट फेज-2 चे उद्घाटन

September 5, 20251 Mins Read
79

India Morning News

Share News:
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने मुंबईतील जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 चे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे देशाच्या औद्योगिक क्षमतेत मोठी वाढ होणार असून हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे कारण देशातील सर्वात मोठ्या कंटेनर कार्गो टर्मिनलचा शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी संयुक्तरीत्या या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

जीएसटी सुधारांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, दुसऱ्या पिढीच्या जीएसटी सुधारांसाठी ते पंतप्रधान मोदींचे आभारी आहेत. सुरुवातीला लोकांमध्ये शंका होती, मात्र आज देशात विक्रमी महसूल मिळत असून महाराष्ट्र करसंकलनात आघाडीवर आहे. या टर्मिनलमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेला नवे बळ मिळणार असून देशाच्या व्यापाराला गती मिळणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share